Zoom Image

सायंकाल
Sayankal

Language मराठी
Author वि.स.खांडेकर
Publication मेहता पब्लिशिंग हाऊस
Category निबंध
Age Group All
Book Highlights NA
ISBN Number 978817-7661750
No Of Pages 108
Summery ‘‘लघुनिबंधांतली काव्यस्थळे मावळत्या सूर्याच्या सौम्य सोनेरी छटांसारखी असावीत, त्यातला विनोद हा अर्धवट मिटलेल्या कमळांसारखा मोहक, पण नाजूक – पोट धरून हसविणारा नव्हे, नुसता गालाला खळी पाडणारा – असावा आणि त्यातून सूचित होणारे तत्त्वविचार क्षितिजावर नुकत्याच चमकू लागलेल्या चांदण्यांप्रमाणे – विरळ, पण सुंदर – असावेत, अशा ज्या काही कल्पना माझ्या मनात घोळत होत्या, त्या व्यक्त करण्याकरिताच "सायंकाल" या नावाचा मी आश्रय घेतला...’’ वि.स.खांडेकरांनी कथाकादंबNयांबरोबरच, लघुनिबंधांचेही विपुल लेखन केले आहे. मराठी साहित्यात लघुनिबंध हा साहित्यप्रकार रुजवण्यात आणि तो विकसित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे, या संग्रहातील निबंधांवरून सुस्पष्टपणे लक्षात येते. या संग्रहातील लघुनिबंधांमध्ये काव्य, विनोद व तत्त्वज्ञान यांचा सुरेख संगम साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे लघुनिबंध वाङ्मयगुणांनी अलंकृत आणि विचारप्रवर्तक आहेत.
Translator NA
Weight 150 Gm

120


Customer Also Bought


Customer Reviews ( 0 )